पिंपळगाव बसवंत – पिंपळगाव बसवंत खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी संपतराव जनार्दन मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. खरेदी-विक्री संघाचे दिवंगत चेअरमन प्रतापराव मोरे यांचे नुकतेच निधन झाल्याने संघाच्या चेअरमन निवडीसाठी शनिवारी (दि.७) सकाळी ११ वाजता निवडणूक अधिकारी एस. आर. ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी चेअरमन पदासाठी संपतराव मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड होत असल्याचे निवडणूक अधिकारी ढवळे यांनी जाहीर केले. संपतराव मोरे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून संचालक जगन्नाथ महाले, तर अनुमोदक म्हणून मनीषा माणिक निरगुडे यांची स्वाक्षरी होती. या निवड प्रसंगी व्हा. चेअरमन साहेबराव साठे, संचालक रमेश शिंदे, परशराम आथरे, बाळासाहेब मोते, ज्ञानेश्वर जाधव, त्र्यंबक शिंदे, उद्धव निरगुडे, संपत वाटपाडे, गणपत विधाते, साहेबराव पारधे, मॅनेजर पुंडलिकराव निरगुडे आदी उपस्थित होते. संपतराव मोरे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मविप्रचे माजी संचालक विश्वास मोरे, दिलीप मोरे, प्रा.रवींद्र मोरे, बाळासाहेब बनकर, संपत विधाते, रामभाऊ माळोदे, संजय मोरे, सतिष मोरे, गणेश बनकर, रावसाहेब मोरे, शशिकांत मोरे, बापूसाहेब कडाळे, बाळा बनकर आदींसह सभासद उपस्थित होते. निवड झाल्यानंतर नूतन चेअरमन संपतराव मोरे यांनी संघाचे संस्थापक सहकार महर्षी दगू नाना मोरे व दिवंगत चेअरमन प्रतापराव मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
….
बांधिलकी जपावी
खरेदी-विक्री संघाचे संस्थापक सहकार महर्षी दगू नाना मोरे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खरेदी-विक्री संघाची स्थापना केली. शेतकऱ्यांचे हित जोपासत संघाची भरभराट केली व सहकाराचा मजबूत पाया रचला. त्यांच्यानंतर प्रतापराव मोरे यांनी चाळीस वर्ष संघाचे नेतृत्व केले प्रतापदादा यांच्या निधनाने नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, सहकार महर्षी दगूनाना मोरे व दिवंगत चेअरमन प्रतापराव मोरे यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवून नूतन चेअरमन व संचालक मंडळाने या पुढील काळात खरेदी-विक्री संघाचे कामकाज करावे.
– दिलीपराव बनकर, आमदार, निफाड