पिंपळगाव बसवंत – गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अखेर उद्घाटन करण्यात आले. निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते फीत कापण्यात आली.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रोडवर भव्य अशा उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांना तत्काळ ऑक्सीजनची सुविधा मिळावी, यासाठी बुधवारी आमदार दिलीपराव बनकर यांच्याहस्ते फीत कापून रुग्णांच्या सेवेसाठी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन मोरे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, उप अभियंता महेश पाटील, अभियंता छापरवाल आदी उपस्थित होते. कोरोना चाचणीसाठी १००० हजार कीटची मंजुरी शासनाकडून मिळाली आहे. त्यापैकी २०० कीट पिंपळगावसाठी मिळणार असल्याचे दिलीप बनकर यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकार्यांकडून तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आमदार बनकर यांनी घेतला. यावेळी मविप्रचे माजी संचालक विश्वास मोरे, ग्रामसेवक लिंगराज जंगम, शशी राजोळे, पुंडलिक घोलप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चौकट
चौकट
गणेश विसर्जनासाठी प्रभावी उपाययोजना राबविणार
मंगळवारी पिंपळगाव बसवंत येथील कादवा नदीपात्रात गणपती विसर्जन करताना ग्रामपालिका कर्मचारी रवींद्र मोरे या कर्मचा-यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामपालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणा-या यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान,आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने भविष्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, असे आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले.