पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून मंदावलेली कोरोना बधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी जिल्हात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कडक निर्बंध लागू करून देखील पिंपळगाव बसवंत शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेबाहेर नियोजना अभावी बँक व्यवहार करण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी होत सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
जिल्ह्यातील महत्वाची व्यापारी बाजारपेठ म्हणून परिचित असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात कोरोना बधितांची संख्या पुन्हा काही अंशी वाढत असल्याने ग्रामपालिकेका प्रशासनाने कडक निर्बंध व नियमावली लागू केली आहे.मात्र शहरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर नियोजन अभावी सकाळपासून ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत सोशल डिस्टनसिंग पुरता फज्जा उडाल्याने ग्राहकांनी मात्र याबाबत सपशेल नाराजी व्यक्त केली
बँकेचा नियोजन अभाव
उन्हात तान्हात गेल्या दोन तासापासून लाईनीत उभे राहून सुद्धा नंबर लागत नाही.सध्या कोविड सारखी परिस्थिती पुन्हा ऊदभवत असल्याने बँकेचा नियोजन अभाव दिसून येत आहे.सोशल डिस्टनसिंग पाळली जात नाही.
सुनंदा बांडे, बँक ग्राहक