पिंपळगाव बसवंत: संकट काळात दिली होती सेवा, वापरल्या विजेची जाण तुम्ही ठेवा, माय बाप होऊन विचार करा, वीज बिल भरा, तुम्ही वीज भरा, वीज बिल भरून सहकार्य करा, निर्माता दिग्दर्शक गायक, लेखक रवी गोडांबे व कलाकारांनी गाण्यातुन अनोख्या पद्धतीने येथील वीज महावितरण कार्यालयाचे वीज बिले भरण्याबत केलेली अनोखी जनजागृती शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
कोरोनालॉकडाउन काळातही येथील महावितरण कार्यालयाकडून पिंपळगाव बसवंत शहरात ग्राहकांना तीन महिने बिले भरण्यासाठी टप्प्याटप्प्याने सवलत दिली. शिवाय अनेक ग्राहकांचे वीज बिले न भरून सुद्धा वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवल्याने महावितरण कार्यालयाची थकबाकी येणे बाकी आहे.त्यात मार्च अखेर सुरू झाल्याने ग्राहकानी आपले थकीत वीज बिले तातडीने भरावी यास्तव पिंपळगाव महावितरण कार्यालयात व निर्माता दिग्दर्शक गायक, लेखक रवी गोडांबे व कलाकार सुरेश कुराटे, विलास राऊत, वैभव पगार, योगेश शेवरे, गणेश भागवत, तुषार भागवत, किरण रसाळ आदींनी अनोख्या पद्धतीने गाण्यातून जनजागृती करत वीज बिले भरण्याचे आवाहन गाण्यातून केले आहे.