पिंपळगाव बसवंत – येथील बाजार समितीमध्ये मंगळवारी (दि. ३) कांदा दरात ९०० रुपयांची घसरण झाली. क्विंटलमागे ६३०० रूपये भाव मिळाल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारी (दि. २) हाच दर ७२०५ वर स्थिरावला होता.
केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर निर्बंध लादल्याने मागील आठवड्यात चार दिवस व्यापार्यांनी लिलाव बंद ठेवले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.३०) लिलाव पुर्ववत सुरू होताच उन्हाळ कांद्याला ७१४० रूपये दर मिळाला. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला. सोमवारी ७२०५ रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. मात्र, मंगळवारी उन्हाळ कांद्याला ६३०० रुपये दर मिळाला. मागील चार दिवसांच्या तुलनेत कांदा दरात ९०० रूपयांची घसरण झाल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली.
मंगळवारचे उन्हाळ कांद्याचे दर
– कांदा : क. कमी-२१००, जा. जास्त-६३००, सरासरी-४८००.
– गोल्टी : क. कमी-१०००, जा. जास्त-४००१, सरासरी-३८००.
– खाद : क.कमी-४००, जा. जास्त-२९०१, सरासरी-२५००.
*लाल कांद्याचे दर*
– कांदा : क. कमी-१५००, जा. जास्त-५०००, सरासरी-३९००.
– गोल्टी : क. कमी-४००, जा. जास्त २९०१, सरासरी-२४००.