पिंपळगांव बसवंत : निफाड तालुक्यातील मुखेड येथे शेतातील रस्त्यावर असलेला दगड बाजूला केल्याची कुरापत काढून सहा जणांच्या समुहाने शेतक-याला जबर मारहाण केली. तशी तक्रार पिंपळगांव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, जगदीश निवृत्ती दातीर (रा.मुखेड) येथे स्वताच्या द्राक्षबागेवर औषध फवारणी करीत होते. शेतातील रस्त्यावरील दगड बाजूला केल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण केली. पत्नी अर्चना दातीर यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे या मारहाणीत गहाळ झाले आहे, अशी तक्रार दातीर यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.