नवी दिल्ली – सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या पती, गौतम किचलू याच्यासोबत मालदीवला हनीमूनसाठी गेली आहे. मालदीवच्या निरनिराळ्या ठिकाणांचे फोटो काजल आपल्या चाहत्यांसाठी शेअर करते आहे. नुकतेच तिने पतीसोबत पाण्याखालची सफर एन्जॉय केली. त्याचेही फोटो तिने शेअर केले.
याआधीच्या एका फोटोत देखील ते पाण्याखालच्या एका खोलीत दिसले होते. आणि त्यांच्या आसपास बरेच मासेही होते. हा रोमँटिक फोटो चांगलाच गाजला होता. अभिनेत्री काजोलच्या लग्नाच्या फोटोजपासून हनीमूनच्या फोटोजपर्यंत सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर आहेत. गौतम आणि काजल एकमेकांना सात वर्षांपासून ओळखतात. आताच्या कोरोनाच्या काळात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत काजल सांगते की, आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. पण या लॉकडाउनच्या काळात आम्ही कित्येक दिवस परस्परांना भेटू शकलो नाही. त्यावर पर्याय म्हणून आम्ही मास्क घालून दुकानात जाऊन भेटायचो. याच काळात आम्हाला एकमेकांवरचा प्रेमाची जाणीव झाली. तसंच आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे देखील आम्हाला कळलं. शिवाय आम्हाला एकत्र राहायचे आहे, हे कळलं. त्यानंतर गौतमने मला लग्नासाठी विचारलं आणि मी त्याला नाही म्हणू शकले नाही.