नाशिक – नाशिक मधील मित्रांनी नवीनच सुरू केलेल्या ट्रेंट म्युझिक कंपनीच्या ‘गुज पावसाचे’ या पहिल्या मराठी पावसावरील गीतांचा ट्रेझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा अल्बम लवकरच ट्रेंट म्युझिक या यु ट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. सिन्नरच्या शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश शेलार यांच्या आवाजात यात सर्व गाणी ध्वनीमुद्रित झालेली आहे. या सर्व अल्बमला त्यांचे संगीत आहे. तर नाशिकच्या अनिल धुमाळ यांचे संगीत संयोजन आहे. महाराष्टातील प्रसिद्ध कवी व चित्रपट गीतकार प्रकाश होळकर, कवी इंद्रजित भालेराव,लोककवी प्रशांत मोरे ,चांदवड येथील गीतकार विष्णु थोरे, प्रशांत केंदळे, रविंद्र कांगणे यांनी गीते लिहिलेली असून या गीतांचे दिग्दर्शन मंदोदर पारधी यांनी केले आहे.
त्रंबकेश्रवर, घाटघर, निमगाव (दे),सिन्नर या परिसरात या गीताचे चित्रीकरण करण्यात आले असून यंग्राड फेम अभिनेत्री शिरीन पाटील, अभिनेता प्रतीक मिठे या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. बालकलाराकारांच्या भूमिकेत सिन्नरच्या अद्विका पाटील, सर्वस्व काकुळते यांनी भूमिका साकारल्या आहेत.
गायक संगीतकार ऋषिकेश शेलार यांनी या अगोदरही चित्रपट व मराठी मालिकेसाठी गायन केले असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी सुफी गायनाचे कार्यक्रम ही केले आहे. ‘गुज पावसाचे’ हा त्यांचा स्वतंत्र आविष्कार या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ट्रेंट म्युझिक हे नाशिकच्या नवीन कलाकारांना एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करत आहे. या पहिल्या वाहिल्या गीतांचा ट्रेझर बघण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा….
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!