सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत मुसळधार
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. कुलाबा वेधशाळेत ऑगस्टमधील पावसाचा २२ वर्षांचा विक्रम बुधवारी नोंदविण्यात आला. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र व राज्याच्या अन्य भागातही मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर आले आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. शेकडो वृक्ष कोसळले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली, पालघर, कोल्हापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड आदी जिल्ह्यांमध्ये जाेरदार पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील अनेक नद्यांना पूर आला आहे.