दिंडोरी – तालुक्यात गेल्या १५ दिवसापासून सतत पडण्या पाऊसामुळे धरण पाणीसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे पालखेड धरणामध्ये ८२.५६% पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पालखेड धरणामधून ४३७ घनफुट प्रति सेकंद इतका पाण्याचा विसर्ग कादवा नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता सुदर्शन सानप यांनी दिली आहे. पालखेड सोबतच पुणेगाव धरणातून ओझरखेड धरणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सतत पडणा-यां पाऊसामुळे करंजवण धरणात ५९.६९%, वाघाड धरण ७१.०४%, ओझरखेंड धरण ५५.५६%, पुणेगाव धरण ८३.५८%. तर तीसगाव धरणामध्ये २१ % भरले आहे. त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या नद्याचे पाणी पालखेड धरणात जमा होत असल्यामुळे सावधानता बागळून पालखेड मधून पाणी सोडण्यात आले आहे.
पुणेगाव धरण ८४ टक्के भरल्याने व दिवसभर दमदार पाऊस सुरू असल्याने पुणेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. झारली-गोळशी वळण योजनांमुळे वाघाड व मांजरपाडा वळण योजनेमुळे पुणेगाव धरणात अधिक पाणी येऊ लागले आहे.
दिंडोरी तालुक्यातील धरणावर अहमदनगर, मराठवाड्यासह जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, चांदवड मनमाड, येवला तालुक्यातील शेतीची मदार आहे. त्यांमुळे या धरणांकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष केंद्रित असते. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे बळीराजामध्ये समाधान व्यक्त होत आहे.