नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे. यावेळेस हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन करुन मौन पाळण्यात आले.तसेच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.*
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार किशोर दराडे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, आमदार सुहास कांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड,मालेगावच्या महापौर शेख रशिदा जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्याधिकारी लीना बनसोड यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित आहे.