अहमदनगर – ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी २५ लाख रुपये घेऊन जा असे आवाहन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीमधील मतदारांनी आपल्या गावची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे आणखी १० ग्रामपंचायत असा निर्णय घेण्याबाबत विचार करत आहे. विशेष म्हणजे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीने सुध्दा प्रतिसाद दिला आहे. ही ग्रामपंचायत पारनेर तालुक्यात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाऊबंदकी, वाद मोठ्या प्रमाणात होतात. निवडणुकीनंतर हे वाद संपत नाही. त्यानंतर गावाच्या विकासालाही याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध झाल्या तर त्यातून गावाचा विकास होईल. ही कल्पना आमदारांनी मांडली. त्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आमदार लंके प्रमाणेच अनेक आमदारांनी अशा घोषणा केल्या आहे. पण, त्याची माहिती अजून पुढे आली नाही.