नाशिक – येथील आशा ग्रुप संचलित पारख क्लासेस ने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. बारावी बोर्डाच्या वर्ष २०२० परीक्षेत क्लासच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले. या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सत्कार समारंभ बुधवारी (२ सप्टेंबर) झाला. मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन डॉ. नमिता कोहोक यांच्या हस्ते कॉमर्स मधील सर्वांसाठी मोफत मोबाईल ॲप चे लोकार्पण केले गेले. याप्रसंगी इयत्ता ११ वी पासून ते बीकॉम व सीए साठी मोफत कार्यशाळा सुरू करण्यात आली.
इयत्ता बारावीच्या निकालात साक्षी डोगरा ही विद्यार्थिनी ९४ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आली. नाशिक शहरात असलेल्या सर्व सीए क्लासेस मध्ये तिने सर्वाधिक गुण मिळवले. सलोनी अग्रवाल ही विद्यार्थिनी ५९८ गुण मिळवून द्वितीय आली. तिला अकाउंट विषयात ९९ टक्के गुण मिळाले. विविध विषयांमध्ये खालील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले. त्यात स्नेहल मते (अर्थशास्त्र – ९३%), साक्षी डोंगरा (वाणिज्य संघटन व इंग्रजीमध्ये ९२%), पल्लवी पाटील व स्नेहल मते
(चिटणीस कार्यपद्धती मध्ये ९१ टक्के) या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करताना पारख क्लासेसचे मुख्य शिक्षक प्रा सीए लोकेश पारख व संचालिका प्रा सपना पारख उपस्थित होत्या. त्यांनी सर्व विद्यार्थी व पालकांनी मोफत मोबाईल ॲप व कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन सीए लोकेश पारख यांनी केले आहे.