मुंबई – देशात पापड कोणत्याही नावाने ओळखला जात असला तरी त्यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावला जात नाही. तसेच पापडाच्या आकारावरूनही त्यावरील करांचा दर वेगवेगळा नसतो, असे स्पष्टीकरण केंद्रीय अप्रत्यक्ष शुल्क आणि सीमा शुल्क बोर्डाने (सीबीआयसी) दिले आहे. उद्योगपती हर्ष गोएनका यांनी केलेल्या ट्विटला सीबीआयसीने उत्तर दिले आहे. गोलाकार पापडांना जीएसटीमधून सवलत तर इतर आकाराच्या पापडांना शुल्क लावला जातो असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते.
आरपीजी एंटरप्राईजचे चेअरमन गोएंका यांनी ट्विटवर लिहिले की, “गोलाकार पापडांना जीएसटीमधून सवलत मिळते तर, वर्गाकार पापडांना वस्तू आणि सेवा कर लावला जातो, हे तुम्हाला माहिती आहे का? यामागील तर्क सांगणार्या चांगल्या चार्टर्ड अकाउंटटबद्दल मला कोणी सांगू शकेल का?”
सीबीआयसीने रात्री उशिरा गोएंका यांच्या ट्विटचा हवाला देताना उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, पापड कोणत्याही नावाने ओळखला जात असेल, पण त्यावर वस्तू आणि सेवा कर अधिसूचना संख्या २/२०१७-सीटी च्या संख्या ९६ अंतर्गत जीएसटी लागू होत नाही. त्यानंतर्गत पापडांच्या आकाराच्या आधारावरून कोणताच भेद केला जात नाही. ही अधिसूचना (cbic.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.