नवी दिल्ली – आजच्या काळात आधार कार्ड सर्वात महत्वाचे दस्तऐवज बनले आहे. सर्व शासकीय, निमशासकीय आणि शैक्षणिक कामांमध्ये आधार कार्ड वापरले जाते. तसेच मुलांनाही आधार कार्ड आवश्यक असते, आपल्या मुलाचे वय ५ वर्षांपेक्षा कमी असेल तर आपण देखील त्याच्यासाठी तयार केलेले आधार कार्ड मिळवावे लागेल. हे निळ्या रंगाचे कार्ड असून त्याला बाल आधार कार्ड म्हणतात. आता आपल्याला हे आधार कार्ड कसे तयार करता येईल ते जाणून घेऊ या…
लहान मुलांनाही आधार कार्ड आवश्यक आहे. याला बाल आधार कार्ड म्हणतात, मात्र जेव्हा मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असेल तेव्हा हे कार्ड अवैध होईल. कार्ड अवैध झाल्यानंतर मुलाला पुन्हा नवीन आधार कार्ड घ्यावे लागेल, त्यासाठी बायोमेट्रिक अद्ययावत करावे लागेल.
१) मुलाचे बायोमेट्रिक किंवा डोळे स्कॅन बाल आधार कार्डमध्ये होणार नाही, कारण लहान मुलांमध्ये बायोमेट्रिकचा विकास होत नाही. त्याऐवजी मुलाच्या पालकांची कागदपत्रे घेतल्या जातील. मुलाच्या आधार कार्डासाठी अर्जदार हे भारतातील रहिवासी असले पाहिजेत आणि त्यांचे वय ५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.










