नवी दिल्ली ः देशातील पाच राज्यात कोरोना महामारीची पहिली लाट लोप पावली असून, दुसरी लाट चारपट वेगाने फैलावत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दुसरी लाट आली आहे. वरील राज्यात पहिल्या लाटेदरम्यान एका दिवसात १० ते २० हजार रुग्ण आढळत होते. परंतु आता दुस-या लाटेत ४० ते ५० हजारांपर्यंत रुग्ण आढळत आहेत.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांमध्ये अधिक चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीही रुग्णांचे आकडे कमी होण्याचे चिन्हे नाहीत. गेल्या २१ दिवसांमध्ये संसर्गाचा दर दोनवरून वाढून ११ टक्क्यांवर गेला आहे. दररोज १० ते ११ लाखांदरम्यान चाचण्या केल्या जात आहेत.
गेल्या एका दिवसात फक्त आठ लाख नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ११.५८ टक्क्यांहून अधिक कोरोनारुग्ण आढळले आहेत. पाचही राज्यात एकूण ७५.८८ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. आठ राज्यात ८४.५२ टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, एका दिवसात सर्वात जास्त रुग्ण आढळल्यानंतर देशात एकूण बाधितांची संख्या १,२५,८९,०६७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १,६५,१०१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच १,१६,१३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
सलग २६ व्या दिवशी नव्या रुग्णांची भर पडल्याने देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७,४१,८३० झाली असून त्याचा दर ५.८९ टक्के आहे. बरे होण्याचे प्रमाण घसरून ९२.८० टक्क्यांवर आले आहे. यादरम्यान ५२,८४७ रुग्ण बरे झाले आहेत. यापूर्वी १२ फेब्रुवारीला देशात सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या १,३५,९२६ इतकी होती.
चाचण्या वाढवण्याच्या सूचना