नवी दिल्ली – देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मुख्य़ निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी त्याची आज पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. मार्च अखेरीस आणि एप्रिल महिन्यात या निवडणुका होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदानाच्या तारखा अशा
तामिळनाडू
मतदान – ६ एप्रिल
मतमोजणी – २ मे
पश्चिम बंगाल
एकूण ८ टप्प्यात मतदान
पहिला मतदान – २७ मार्च
दुसरा टप्पा – १ एप्रिल
तिसरा टप्पा – ६ एप्रिल
चौथा टप्पा – १० एप्रिल
पाचवा टप्पा – १७ एप्रिल
सहावा टप्पा – २२ एप्रिल
सातवा टप्पा – २६ एप्रिल
आठवा टप्पा – २९ एप्रिल
मतमोजणी – २ मे
केरळ
मतदान – ६ एप्रिल
मतमोजणी – २ मे
आसाम
एकूण ३ टप्प्यात मतदान होईल.
पहिला टप्पा – २७ मार्च
दुसरा टप्पा – १ एप्रिल
तिसरा टप्पा – ६ एप्रिल
मतमोजणी – २ मे
पुद्दुचेरी
मतदान – ६ एप्रिल
मतमोजणी – २ मे एप्रिल
पोटनिवडणूकही
केरळमधल्या मल्लापूर आणि तामिळनाडूतल्या कन्याकुमारी, या लोकसभा मतदार सघांमधली पोटनिवडणुकही ६ एप्रिलला होणार आहे. या सर्व निवडणुकांसाठीची मतमोजणी २ मे रोजी होईल.
मतदारसंख्या
पश्चिम बंगालमध्ये २९४, तामिळनाडूत २३४, केरळ १४०, आसाम १२६,तर पुदुच्चेरीमध्ये विधानसभेच्या ३० जागा आहेत. एकूण ८२४ मतदारसंघामध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी १८ कोटी ६४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.