नवी दिल्ली – जम्मू भागात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट होत आहे. यावर्षी नियंत्रण रेषेलगत शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ३१८६ घटना (१ जानेवारी ते ७ सप्टेंबर) घडल्या आहेत. याव्यतिरिक्त, जम्मू प्रदेशात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर यावर्षी (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) दरम्यान सीमेपलिकडून गोळीबाराच्या २४२ घटना घडल्या आहेत.
यावर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये (७ सप्टेंबर पर्यंत) ८ जवानांचा मृत्यू झाला असून २ जवान जखमी झाले आहेत. याव्यतिरिक्त, जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ सीमा सुरक्षा दलाचे ५ जवान जखमी झाले आहेत.
शस्त्रसंधी उल्लंघन घटनांना आवश्यकतेनुसार, भारतीय सैन्य / बीएसएफकडून चोख प्रत्त्युत्तर देण्यात आले. याव्यतिरिक्त, शस्त्रसंधी उल्लंघनाची सर्व प्रकरणे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हॉटलाइन प्रणाली , ध्वज बैठक, लष्करी कारवाया महासंचालक चर्चेच्या माध्यमातून तसेच दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक मार्गांद्वारे कळवण्यात आली. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत सीएम रमेश यांना लेखी उत्तरात ही माहिती दिली.