नवी दिल्ली – पाकिस्तानातील अत्यंत जुलमी कथा सातत्याने समोर येत असतात. आताही एक प्रकार समोर आला आहे. एका हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर या मुलीचे बळजबरी धर्मांतर करण्यात आले. तिला मुस्लिम बनवून तिच्याशी मौलवीने लग्न केले आहे. हा संतापजनक प्रकार सोशल मिडियात व्हिडिओच्या रुपात समोर आला आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा होत असून पाकिस्तानातील या काळ्या प्रकारांचा पुन्हा एकदा निषेध केला जात आहे. ही मुलगी अवघ्या १३ वर्षांची म्हणजेच अल्पवयीन आहे. तर, मौलवी हा वयस्कर आहे. त्यामुळे असे प्रकार पाकिस्तानात खपवून कसे घेतले जातात, असा प्रश्न उपस्थित करीत सोशल मिडियामध्ये अनेकांनी या घटनेची निंदा केली आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/SAMRIReports/status/1369595324277403651