लाहोर- पाकिस्तानात कोरोना महामारीच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंजाब प्रांतातील सात शहरांमध्ये सोमवारी लॉकाडाउन घोषित करण्यात आले आहे. यामध्ये लाहोर, रावळपिंडी, सरगोधा, फैसलाबाद, मुल्तान, गुजरांवाला आणि गुजरात या शहरांचा समावेश आहे. लॉकडाउनदरम्यान या शहरांमध्ये सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. लग्नसमारंभ हॉल बंद ठेवण्या सोबतच सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.
इस्लामाबादमध्ये मास्क वापरणे बंधनकारक
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न वापरणा-या विरोधात कारवाई केली जाणार आहे. हा नियम पुढील दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे.
बाहेरून येणा-या विमानांवर १८ मार्चपर्यंत प्रतिबंध
देशात येणा-या विमानांवर १८ मार्चपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याशिवाय अ वर्गात असलेल्या देशांची संख्या २४ वरून घटून १५ केली आहे.