मुल्तान – दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारे तसंच दहशतवाद्यांना देशात आसरा देणार्या पाकिस्तानमधी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून पाकिस्तानमधलं सत्य बाहेर आलं आहे. संपूर्ण जगात पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.
एका केकमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. एक केक खाण्यासाठी इथले नागरिक एकच गर्दी करून केकवर तुटून पडले.
पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी मुल्तान इथं रस्त्याचं लोकार्पण करण्यासाठी पोहोचले होते. यासाठी एक केक मागविण्यात आला होता. व्हिडिओमध्ये कुरेशी यांच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे. गर्दीमध्ये धक्काबुक्की केली जात आहे. तिथं व्यवस्थित उभं रहायलासुद्धा जागा दिसत नाही. कुरेशी यांनी केक कापताच आजूबाजूचे नागरिक त्यावर तुटून पडले आणि एकच गोंधळ उडाला.
केक खाण्यासाठी अक्षरशः मारामारी झाली. ज्याला जितका केक मिळाला, तो घेऊन तिथून प्रत्येक जण निघाला. केक खाण्यासाठी लोक इतके उतावीळ झाले होते की त्यांचे ना कपड्यांकडे लक्ष होते, ना कोरोनाच्या नियमांकडे. पाकिस्तानमधील हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून, त्यावर नागरिक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/nailainayat/status/1358752588183851009