नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभूत केले आहे. यावेळी निमित्त होते आंतर संसदीय युनियन (आयपीयू-इंटर पार्लमेंटरी युनियन) च्या निवडणुकीचे. आयपीयू अध्यक्षांच्या निवडणुकीत पोर्तुगालने मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. चार देशांच्या स्पर्धेत पाकिस्तानने चौथे स्थान पटकावले. या निवडणुकीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पोर्तुगालचा विजय निश्चित करण्यासाठी बिर्ला यांनी विविध देशांसह प्रमुख भूमिका बजावली. आयपीयू अध्यक्षांना एकूण ३९४ मते मिळाली. बहुमताचा आकडा १९८ होता आणि पोर्तुगालचा दुतेर्ते पचेको २२२ मतांनी विजयी झाले. त्यांच्या इतर प्रतिस्पर्ध्यांपैकी उझबेकिस्तानच्या अकमल सैदोव यांना ६७, कॅनडामधून सलमा अताउल्लाजन आणि पाकिस्तानच्या मोहम्मद संजरानी यांना ५२ मते मिळाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारताचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या निवडणुकीत सक्रिय होते आणि त्यांनी पाकिस्तानला विजयी होऊ देऊ नये अशा रणनीतीवरही काम केले. कोरोनामुळे निवडणूक प्रचार आणि मतदान व्हर्च्युअल पद्धतीने झाले. यावेळी आयपीयूच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या २०६ व्या बैठकीत ओम बिर्ला यांनी भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व नवी दिल्लीतून केले.
जागतिक संस्था असल्याने परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकार यांनाही यात रस आहे. याआधी १९७३ ते १९७६ साली तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जीएस ढिल्लो यापदावर अध्यक्ष होते. त्यानंतर राज्यसभेच्या उपसभापती नजमा हेपतुल्ला यांना देखील या पदाचा मान मिळाला होता.