नवी दिल्ली – पाकिस्तान सरकारबद्दल कायम त्यांच्या नाचक्कीच्याच बातम्या कानावर पडत असतात. त्यातल्या त्यात कायम शेजारी राष्ट्रांसोबत घातपात करण्याचा डाव रचणाऱ्या पाकिस्तानी सैन्याची तर कायमच नाचक्की होत असते. अलीकडेच पाकड्यांच्या नाकावर टिच्चून इराणने आपल्या दोन सैनिकांना सोडवले तेव्हा जगभरात पाकिस्तानचे हसू होत आहे.
इराण सुरक्षा दलाच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने पाकिस्तानात घुसून आपल्या दोन सैनिकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवले. अर्थात हे दहशतवादी म्हणजे पाकिस्तानी सैन्यासाठीच काम करणारे असतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. २०१८ मध्ये या दोन सैनिकांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. एनाडोलू एजन्सीने सांगितले की रिव्होल्यूशनरी गार्ड्सने यांना सोडविण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीत सिक्रेट आपरेशन चालवले.
रिव्होल्यूशनरी गार्ड्सने एक अधिकृत वक्तव्य जारी केले असून यात दोन सैनिकांना जैश उल-अदलच्या तावडीतून सोडविल्याची माहिती दिली आहे. हे सैनिक इराणमध्ये दाखल झाले आहेत. १६ आक्टोबर २०१८ ला सिस्तान प्रांतातील मरकावा शहरात त्यांचे अपहरण झाले होते. त्यांना सोडविण्यासाठी पाकिसतान आणि इराणच्या सेना अधिकाऱ्यांनी एक बैठकही घेतली होती. त्यानंतर एक संयुक्त टीम नेमण्यात आली.
मुळात ११ सैनिकांचे अपहरण झाले होते. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ मध्ये पाच आणि मार्च २०१९ मध्ये चार सैनिकांना सोडविण्यात यश आले होते. त्यानंतर आता आणखी दोघांची सुटका करण्यात यश आले आहे. आता पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना मारणाऱ्या देशांमध्ये इराणच्या निमित्ताने आणखी एका देशाची भर पडली आहे. यापूर्वी भारत आणि अमेरिकेने पाकड्यांना घरात घुसून मारले आहे.