कानपूर – पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या आरोपात ८ वर्ष तुरूंगवास भोगलेले शमशुद्दीन रविवारी रात्री २८ वर्षानंतर आपल्या घरी पोहोचले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. आनंदामुळे त्यांची बहीण बेशुद्ध पडली. त्यांच्या आगमनामुळे त्यांच्या परिवारासह संपूर्ण गावाने दिवाळी उत्साहात साजरी केली.
शमसुद्दीन २६ ऑक्टोबर रोजी त्याच्या मूळ गावी अमृतसरला पोहोचले. परंतु कानपूरला पोहोचण्यास बराच वेळ लागला. शुक्रवारी रात्री स्थानिक पोलिस आणि गुप्तचर संस्था त्यांना अमृतसरला घेण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री संपूर्ण टीम शमसुद्दीनसह पोलिस स्टेशन बजरिया येथे पोहोचले. जमशेदपूरचे त्रिपुरारी पांडे व इतर अधिकाऱ्यांनी शमसुद्दीनचे स्वागत केले. शमशुद्दीन म्हणाले, आमच्यासाठी ही दिवाळी संस्मरणीय बनली आहे. शमशुद्दीनचा धाकटा भाऊ फहीमुद्दीन याने पोलिस स्टेशनमध्ये औपचारिकता पूर्ण केली आणि त्यानंतर पोलिस दलाने त्याला कोंबल मोहल येथील घरी सोडले. परिसरातील लोक व नातेवाईकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला व फुलांच्या हाराने त्यांचे स्वागत केले. यावेळी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.