नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे आज जगातील अत्यंत महागडी कार खरेदी करू शकतात. सुमारे २० वर्षांपूर्वी देखील त्यांना मोटारींबद्दल अत्यंत आवड (क्रेझ) होती. परंतु त्यावेळी त्यांच्या बँक खात्यात कार खरेदी करण्याइतकी शिल्लकपण नसल्याचे सांगण्यात येते. आणि ज्यावेळी त्यांनी पहिली कार खरेदी केली तेव्हा ते अत्यंत भावूक झाले होते.
एलोन मस्क यांनी नुकतीच पहिली सुपर कार मॅकलारेन एफ १ ही खरेदी केली. अलीकडेच एका नवीन कारसह सिलिकॉन व्हॅलीमध्ये डिलिव्हरी घेत असल्याचे दिसून आले आहेत. यासंबंधीच्या व्हिडिओमध्ये कारला “दशलक्ष डॉलर्स” सुपरकार म्हटले जात आहे. अशा प्रकारची जगात फक्त ६२ मॅकलरेन एफ १ वाहने आहेत आणि मस्क यांच्याकडे यापैकी एक दुर्मिळ सुपरकार आहे. कारच्या वितरणावर मस्क खूप उत्साही दिसले आणि ते भावूक झाले. मस्क यांनी स्पष्ट केले की, मी दहा लाख डॉलर्सची गाडी विकत घेतली. माझ्या आयुष्यातील हा एक महत्वाचा क्षण आहे.
अशी आहे कार
१) कारमध्ये नैसर्गिकरित्या एस्पीरेटेड व्ही १२ इंजिन वापरण्यात आले आहे. ते ६१८ पॉवर आणि ६२७ पीएस टॉर्क देते. मॅकलरेन एफ १ कार फक्त ३.२ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग घेते.
२) आतापर्यंतच्या वेगवान उत्पादन कारंपैकी एक आहे. काही वर्षांपूर्वी वेगवान इंजिन असलेल्या कारसाठी इलेक्ट्रिक कारच्या निर्मात्याचे कौतुक झाले होते.
३) मस्क यांनी खरेदी केलेली कार जगातील सर्वात वेगवान कार आहे. आता मॅकलरेन कारची डिलिव्हरी घेण्याच्या वेळी त्यांच्या समवेत त्यांची मैत्रिण व भावी पत्नी जस्टिस विल्सनसुद्धा दिसून आली.