शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पहिल्यांदाच नळाने पाणी आलेल्या सावर्डे गावाची ही गोष्ट

by Gautam Sancheti
डिसेंबर 26, 2020 | 9:52 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20201226 WA0011

सावर्डे आणि पाणी पुरवठा

प्रथमच नळाने पाणी मिळालेल्या सावर्डे गावाच्या पाणीदार संघर्षाची ही कथा…. अनेकांना धडा देणारी तर काहींच्या डोळ्यात अंजन घालणारी….
– डॉ. वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे (सामाजिक आरोग्य सल्लागार, नाशिक)
सावर्डे – नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . .  पुर्णत: जंगलात.  तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजूनही बारमाही रस्ता नाही.  म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेऊन या गावात जाता येणार नाही. अशी परिस्थिती होती सन २०१८ पर्यंत. सावर्डे गाव गेल्याच वर्षी रस्त्यानं जोडलं गेलंय, ते स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी. मोखाडा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायती अंतर्गत असलेलं सावर्डे गावात पोहोचायला दरीतील घाट उतरुन जावं लागतं.
तीन वर्षापूर्वी पहिल्यांदा आम्ही गावात पोहोचल्यावर गावकऱ्यांनी पहिली सूचना हीच दिली की दुपारी पाऊस सुरु झाला तर गाडी वर चढवता येणार नाही. शेजारचं गाव डोंगर चढून पाच किलोमीटर अंतरावर. . . गावापासून जवळच अजून खाली (पायी चालत + डोंगर उतरुन १ किलोमीटर) पाणी आहे.  हे पाणी म्हणजे खरं तर वैतरणा नदी. पण आता वरच्या बाजूला मध्य वैतरणा धरण आणि खाली मोडक सागर असा विकास झाल्याने मोडक सागरमध्ये जेव्हा पाणी सोडायचं असेल तेव्हा या नदीला (पाटाला) पाणी येत. संपुर्ण पाषाणाचा तळ असलेल्या नदीच्या काठाला ग्रामपंचायतची विहीर आहे. पाटाला पाणी सोडल की झिरपून विहीरीत येतं मग तेव्हाच ते मोटरनं उचलून गावाजवळ उंचावर बांधलेल्या टाकीपर्यंत पोहोचविण्यासाठी पुर्वी कधी पाईपलाईनही केली होती. पण तेव्हाच्या योजनेत काही त्रुटी राहिल्यानं गावापर्यंत पाणी कधी आलंच नाही. यातला अजून एक कॅच म्हणजे जेव्हा हे मिडल वैतरणा टू मोडक सागर असं ट्रान्झॅक्शन सुरु असतं तेव्हा बऱ्याचदा वीजप्रवाह खंडीत असतो. नदीतलं पाणी डायरेक्ट उचलायची परवानगी नाही, कारण ते मुंबईसाठी राखिव आहे ना. . . .
IMG 20201226 WA0015
मग पर्याय काय, नदीवरुन हंड्याने पाणी भरणे. सरासरी एका कुटुंबाला दिवसाकाठी पिण्यासाठी आणि वापरासाठी मिळून १० हंडे पाणी लागतं. लांबून, दरीतून एकावेळी दोन हंडे डोक्यावर घेऊन , चढून पाणी भरायचं..  दिवासाचे चार तास घरटी दोन सदस्य केवळ पाणी भरायला जुंपलेले. मेहनतीचं काम म्हटलं की महिला अन् मुलीच अडकलेल्या. गावात असलेल्या चौथीपर्यंतच्या जि. प. शाळेतले शिक्षण पुर्ण झाले की मग मुली याच कामाला घरी राहत. थोडी ऐपत असलेल्या मंडळीनी बैलगाडीवर दोनशे लीटरचे ड्रम बसवून घेतलेत. तीन किलोमीटर लांबचा फेरा करुन कच्या  रस्त्याने बैलगाडी नदीपर्यंत उतरवता येते. डोळ्यासमोर अथांग जलसाठा असूनही हे रोजचे कष्ट. महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य वैगेरे कोसो वर कुठेतरी आहे अजून…
“प्रोजेक्ट आशा” अंतर्गत तीन वर्षापूर्वी हे गाव बायफच्या सर्वांगिण विकास कार्यक्रमाशी जोडलं गेलं. गावकऱ्यांची पहिली मोठी अडचण म्हणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हाती घेतला. रस्ता नसतानाही साहित्य गावात पोहोचवून विहीरीवर सर्वप्रथम १२ HP क्षमतेची जलपरी बसवली. आधीच्या योजनेतली मोटार पुर्णपणे गाळात रुतलेली होती. विहिरीतला गाळ साफ करण्याची जबाबदारी गावातल्या युवकांनी पार पाडली. दरीमधली ही विहिर ते गावाजवळची टाकी अशी १२०० मीटरची पाईपलाईन नव्यानं बसवली. पुन्हा गावानं श्रमदानाची तयारी दाखवत गावात नळाने पाणी आणण्याचे ठरवले. मग पुन्हा टाकी ते गाव अशी पाईपलाईन टाकत गावात पाच ठिकाणी स्टॅन्ड पोस्ट उभारले.
इतकं सगळं झाल्यावर अडचण अशी आली की विहिरीजवळचा विद्युत पुरवठा नदीपलिकडच्या शहापूर तालुक्यातुन होतो. तेथे थ्री फेज कनेक्शन मिळवायला. तालुका, जिल्हा बदल वगैरे असंख्य खेट्या घालाव्या लागल्या. पुन्हा लॉक डाऊनमुळे सगळंच जैसे थे राहील. सर्व समस्यांवर मात करत गेल्या आठवड्यात सावर्डे गावात पहिल्यांदा नळाद्वारे पाणी पोहोचलं. सामाजिक योजनांची यशस्विता तपासण्याचं मापक Social Returns On Investment वापरायचं ठरलं, तर गावातल्या १२५ कुटुंबातील प्रत्येकी दोन महिला सदस्यांचे प्रति दिवस तीन-चार तासाचे शारिरिक कष्ट वाचवता आले.
IMG 20201226 WA0013
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना लस घेतल्यानंतर वर्षभर नो टेन्शन!

Next Post

ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांवर हा परिणाम झाला…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
Next Post

ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांवर हा परिणाम झाला...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011