मुंबई – कोरोनाच्या संकटकाळात अतिशय धौर्याने कार्यरत राहणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिस यासह विविध प्रकारच्या कोरोना योद्ध्यांना नौदलाच्या पश्चिम कमांडने अनोखी मानवंदना दिली. नौदलाच्या बँड पथकाने अतिशय मधूर धून सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या या समारंभात सोशल डिस्टन्सिंगसह विविध नियमांचे कसोशीने पालन करण्यात आले. शनिवारी सायंकाळी झालेला हा सोहळा अतिशय देखणा ठरला.
देशाच्या ७३व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संरक्षण दलाकडून कोरोना योद्ध्यांना सलाम करण्यासाठी देशभरात अशा प्रकारच्या मानवंदनेचे आयोजन केले जात आहे. नौदलाचे गीत जय भारती, कदम कदम बढाये जा, सारे जहाँ से अच्छा अशी गाणी यावेळी सादर करण्यात आली. जवळपास एक तास हा सोहळा रंगला.
या सोहळ्याची ही काही छायाचित्रे…