नवी दिल्ली – भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म जलद गतीने वाढत आहे. यासाठी इंटरनेटची गरज अनिवार्य आहे. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांनी डेटा ऍड ऑन पॅक लॉन्च केले आहेत. याद्वारे रोजच्या अतिरिक्त डेटाची पूर्तता करण्यात येणार आहे. जिओच्या नियमित रीचार्जसह डेटा अॅड ऑन पॅक उपलब्ध करून देण्यात आले. जिओचा प्रारंभिक ऍड पॅक १५१ रुपयांचा आहे. या रिचार्ज पॅकवर ३० जीबीचा अतिरिक्त डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय २०१ आणि २५१ रुपयांचे रिचार्ज पॅक देण्यात आले आहेत. या सर्व तीन डेटा पॅकवर ३० दिवसांच्या वैधतेसह दिले जात आहेत.
असा आहे रिचार्ज पॅक
जिओकडून वर्क फ्रॉम होम ऍड ऑन पॅक अंतर्गत तीन रिचार्ज पॅक दिले जात आहे. जिओच्या १५१ रुपयांच्या रिचार्ज पॅकसह २०१ आणि २५१ असे दोन प्री-पेड रिचार्ज पॅक देण्यात आले आहेत. यात ३० जीबी हायस्पीड ४ जी इंटरनेट सुविधा आहे. त्याचबरोबर २०१ रुपयांच्या अॅड-ऑन पॅकवर ४० जीबी अमर्यादित डेटा ३० दिवसांसाठी देण्यात येत आहे. तसेच ५० जीबी अमर्यादित डेटा २५१ रुपयांच्या रिचार्जवर देण्यात येत आहे.
असा ऍक्टिव्ह करा डेटा पॅक
दररोजचा ठराविक डेटा संपत आल्यावर ऍड ऑन डेटा ऍक्टिव्ह करण्यात येईल. याचा अर्थ असा की, नियमित रीचार्ज पॅकमधून दररोज ३ जीबी डेटा मिळतो. दररोज हा ३ जीबी डेटा पूर्णपणे वापरला जातो, त्यानंतर हा पॅक ऍक्टिव्ह होतो. गरजेनुसार ३० जीबी, ४० जीबी आणि ५० जीबी डेटा पॅक ऍक्टिव्ह करता येणार आहे.