नवी दिल्ली – देशभरात कोविड -१९ लसीकरणाची दुसरी फेरी सोमवारपासून सुरू झाली असून या टप्प्यात सर्वसामान्य लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. या टप्प्यात ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या गरजू रुग्णांना ही लस दिली जात आहे. त्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून शासकीय रुग्णालयांमध्ये ही लस पूर्णपणे मोफत देण्यात येईल, त्याकरिता प्रत्येक राज्यातील रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे.
सरकारी रुणालयात सरकारने लसीची मोफत व्यवस्था केली असून खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपये फी आकारली जाईल. सरकारने प्रत्येक राज्यातील रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे. लसीकरणाचा दुसऱ्या टप्पाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी सोमवारी सकाळी ६.२५ वाजता दिल्लीतील एम्स येथे पोहोचले आणि कोरोना लस देऊन संपूर्ण देशाला संदेश दिला. आयुष्मान भारत-पीएमजेवाय अंतर्गत १० हजार रुग्णालये आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत खासगी क्षेत्रातील ६८७ रुग्णालये कोरोना लसीकरण कार्यक्रमात सहभाग घेत आहे.
कोरोना लसीकरण नोंदणीसाठी सरकारने कोविन अॅप सुरू केले, आता सरकारने लोकांना CoWIN.gov.in वर नोंदणी करण्यास सांगितले आहे.
आपल्या शहरातील खासगी रुग्णालयांची यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
1. https://www.mohfw.gov.in/pdf/CGHSEmphospitals.xlsx
2. https://www.mohfw.gov.in/pdf/PMJAYPRIVATEHOSPITALSCONSOLIDATE