मनमाड – चार दिवसाच्या ढगाळ वातवरण व त्यात अधून मधून पडणाऱ्या रिमझिम पावसानंतर मनमाडकरांनी आज पहाटे दाट धुक्याचा अनुभव घेतला. त्याचे खास फोटोही एका वाचकाने इंडिया दर्पणला पाठवले आहे. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी असल्याचा अनुभव आम्ही घेतल्याचेही या वाचकाने सांगितले. संपूर्ण शहरात या धुक्याची दाट चादर असल्याचा अनुभव येत होता. १०० मीटर अंतरावर सुद्धा काहीच दिसत नव्हते