नवी दिल्ली – पर्यूषण काळात मुंबईतल्या दादर भायखळा आणि चेंबूर येथील तीन जैन मंदिरात शेवटच्या दोन दिवसासाठी प्रार्थना करायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. केवळ पाच भाविकांना एकाचवेळी दर्शनाला सोडण्याचे निर्देशही दिले आहे. हा निर्णय या तीन मंदिरापुरताच आहे. त्यामुळे इतर ठिकाणी असलेली मंदिर बंदच असणार आहे.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पिठानं शुक्रवारी हा निर्णय दिला. राज्य सरकारच्या निर्णयात बदल करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. हा निकाल केवळ पर्युषणापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे केवळ २२ व २३ ऑगस्टला या तीन मंदिरात प्रार्थना करता येणार आहे.