नवी दिल्ली – परीक्षेत उत्तर येत नसेल तर ती जागा रिकामी ठेवू नका काहीही लिहा, असं शिक्षणाशी संबंधितच अधिकाऱ्याने सांगितलं तर, कोणत्याही विद्यार्थ्याला आनंदच होईल. पण असं वक्तव्य करून दिल्लीचे शिक्षण संचालक उदित राय यांनी वाद ओढवून घेतला आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) सांगण्यात आलं आहे की, परीक्षेत विद्यार्थ्यांनी काहीही लिहिलं तरी त्यांना गुण द्यावेत.
भाजप आणि काँग्रेसनं या व्हिडिओवरून दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारच्या शिक्षण मॉडेलची ही आहे सत्यता, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केली. दिल्लीच्या मुलांना इतकं चांगलं शिक्षण मिळत आहे की, शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांचे शिक्षण संचालकच म्हणाताहेत की, उत्तर नाही आलं तर उत्तरपत्रिकेत उत्तराच्या जागेवर प्रश्नच लिहा. गुण मिळून जातील. आम आदमी पक्ष दिल्लीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/adeshguptabjp/status/1362411681457074178