अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली ः अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. युजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं परीक्षा घेण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देशांना आव्हान देण्याच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
यासंदर्भात दाखल विविध याचिकांवर बुधवारपर्यंत एकत्र उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने युजीसीला दिले आहे. त्यावर याचिकाकर्त्त्यांना गुरुवारपर्यंत म्हणणे मांडता येणार आहे. देशातल्या ८०० पैकी २०९ विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या आहेत. तर ३९० विद्यापीठ या परीक्षा घेण्याच्या तयारीत असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले आङे.