मुंबई – स्फोटकांच्या कार प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन नुकतील उचलबांगडी करण्यात आलेल्या आयपीएस अधिकारी परमबिर सिंग यांनी राज्यात शनिवारी खळबळ उडवून दिली आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठ पानी पत्र लिहिले आहे. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते. या आरोपामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने जोरदार टीका केली आहे. गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. तर, तपासाचे धागेदोरे सिंग यांच्यापर्यंत पोहचत असल्याने त्यांनी धादांत खोटे आरोप केले आहेत.
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे राज्यातील राजकारण झवळून निघाले आहे.
https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1373262575958302723
https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1373262578588082181
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1373297054718386178
https://twitter.com/mns4maha/status/1373296715969695744