नाशिक : परप्रांतीय प्रवाशास पैसे दुप्पट करून देतो असे सांगून रोकडसह मोबाईल लांबविणा-या भामट्यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. प्रवाश्याने आरडाओरड केल्याने संशयीत पोलीसांच्या हाती लागला असून, त्याचा साथीदार पसार झाला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरूख नुरमहंमद मदारी (२७ रा.काद्रीनगर वैजापूर जि.औरंगाबाद) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून त्याचा रशिद बुढन मदारी (रा.चाळीसगाव) हा दुचाकीस्वार साथीदार पसार झाला आहे. याप्रकरणी अरूण रामप्रताप गुप्ता (३२ रा. चकगुरैनी जि.कौशाम्बी,उत्तरप्रदेश) यांनी तक्रार दाखल केली असून, गुप्ता गुजरात राज्यातील सिल्वासा येथील दमन प्लास्टीक कारखान्यातील कामगार आहेत. बुधवारी (दि.१३) सिल्वासा येथे जाण्यासाठी ते ठक्कर बाजार बसस्थानकात आले असता ही घटना घडली. दमन प्लॅटफार्मवर बसलेले असतांना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. साई भक्त असल्याचे भासवून संशयीतांनी तूझे कल्याण करून देतो असे सांगून गुप्ता यांनी परिधान केलेला टीशर्ट जसाचा तसा ताब्यात घेतला. यावेळी खिशातील वस्तूची गाठ बांधत संशयीतांनी एक हजार रूपयांची रक्कम आणि मोबाईल लांबविला. ही बाब लक्षात येताच गुप्ता यांनी आरडाओरड केल्याने एक संशयीत पोलीसांच्या हाती लागला असून त्याचा साथीदार पसार झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बैरागी करीत आहेत.