दिंडोरी – परनार्ड रिकॉर्ड कंपनीने युथ ड्रीम फाऊंडेशनच्या या एनजीअो ची नियुक्ती करून नाशिक जिल्ह्यात ४५ शाळा महाविदयालयातील ३६५ विद्यार्थ्यांना ५१ लाख ६० हजार ९९३ रुपये शिष्यवृत्तीचे वाटप केले. दिंडोरी तालुक्यात ही कंपनी असल्याने येथील तालुक्यातील १७ शाळा व महाविदयालयातील २९९ विद्यार्थ्यांना ३० लाख १४ हजार ३०५ रुपये शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
परनार्ड रिकार्ड ही कंपनी राज्य शासनाला वर्षाला साधारण २५०० कोटी रुपये म्हणजे एक दिवसाला ६ ते ७ कोटी रुपये उत्पादन शुल्क व विक्रीकराच्या माध्यमातून महसूल देत आहेत. कंपनीच्या माध्यमातून शासनाबरोबरच स्थानिक ग्रामपंचायत, दिंडोरी नगर परिषद व परिसरातील ३५ ते ४० ग्रामपंचायतीला मदत करते. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची विकास कामे झालेली असून हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,आर्थिक दृष्ट्या मागास व ज्यांना शिक्षण घेण्यासाठी मदतीची गरज आहे अशा घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असल्याचे दिंडोरीचे नागरिक सांगतात.
आदिवासी भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मविप्र संस्थेचे कार्यकारी संचालक दत्तात्रय दादा पाटील, सरचिटणीस निलीमाताई पवार, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ एस. के. शिंदे व कंपनी व्यवस्थापन यांचे संकल्पनेतून या मदतीची कल्पना पुढे आली. त्यानंतर सर्व संस्थांच्या पात्र शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्याची योजना महाव्यवस्थापक संजय खुठिया, व्यवस्थापक राजेंद्र देशमुख, वायनरी हेड शरद नागरे यांनी मूर्त स्वरूपात आणली. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळाला.
दिंडोरी तालुक्यातील या संस्थांना मिळाली मदत
जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी, आर्ट व कॉमर्स कॉलेज खेडगाव ,जनता विद्यालय व जुनिअर कॉलेज करंजवन, जनता विद्यालय निळवंडी, के आर टी आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज वणी, मविप्र आयटीआय मोहाडी, डीएड कॉलेज दिंडोरी, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिंडोरी ,आदर्श हायस्कूल मडकीजांब, बी के कावळे कॉलेज राजारामनगर, शासकीय आयटीआय दिंडोरी, शरदचंद्रजी पवार हायस्कूल निगडोळ, के. व्ही. नाईक कॉलेज दिंडोरी, रा. स. वाघ संचलित माध्यमिक विद्यालय अवनखेड, रा. स. वाघ नर्सिंग कॉलेज राजारामनगर, उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव, व्ही. एन. नाईक संचलित माध्यमिक विद्यालय ढकांबे या विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.