नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी भारत सरकारने पब्जी मोबाईल गेमवर संपूर्ण देशात बंदी आणली होती. यानिर्णयायामुळे पब्जी प्रेमींमध्ये प्रचंड प्रमाणात निराशा पसरली होती. पण, त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. भारतात लवकरच पब्जी पुन्हा कमबॅक करू शकणार असल्याचे संकेत दिसत आहे.
भारतात पब्जीवर घालण्यात आलेली बंद उठवली जाऊ शकते असे चित्र सध्या दिसते आहे. मुळात पब्जची साउथ कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडियो यांचा गेम आहे. बंदी केल्यामुळे पब्जी कंपनीला दिलेली मोबाईल फ्रेंचायजी परत घेतली आहे. तसेच ब्ल्यू होल स्टुडियो आणि रिलायंस जियो यांच्यात डिस्ट्रिब्यूशन संदर्भात बोलणी सुरु असल्याने चर्चाना उधाण आले आहे. ब्लू होल स्टूडियोच्या एका ब्लॉग पोस्टमधून यासंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. भारतात गेम डिस्ट्रिब्यूशनसाठी रिलायन्सशी जियोसोबत बोलली सुरु असून लवकरच यावर निर्णय होईल अशी माहिती पोस्टद्वारे देण्यात आली आहे. आताच यासंदर्भात बोलणी सुरू झाली आहे. दरम्यान, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
भारतात बंदी झाल्यानतंर पबजी कॉर्पो.च्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की, चिनी कंपनी टानसेन्ट गेम्सकडून भारतात गेम पब्लिश करण्याचे राइट्स काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे कंपनी आता भारतात गेम ऑफर करू शकत नाही. परंतु, पबजी कॉर्पो. ही साऊथ कोरियन कंपनी आहे, जी भारतात डायरेक्ट गेम ऑफर करू शकते. या माहितीमुळे पब्जीप्रेमींच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आता भारतात पुन्हा एकदा पबजी गेम कमबॅक करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.