पन्ना रत्न
नवरत्नांपैकी सर्वाधिक मागणी असलेले रत्न म्हणजे पन्ना रत्न होय. इंग्लिश मध्ये त्याला EMRALD म्हणतात. हे बुध ग्रहा संबंधित हिरव्या रंगाचे रत्न आहे. व्यवसायासोबतच मानसिक स्थिरता, भावनिक गुंतागुंत यातून येणारे नैराश्य, त्याचप्रमाणे कुंडलीतील बुध ग्रहाची नकारात्मकता यावर तज्ञांकडून हे रत्न सुचवले जाते. जर सुचवले असेल तरच पन्ना रत्न वापरावे. फक्त आपण व्यवसायिक आहोत, म्हणून पन्ना रत्न अजिबात वापरू नये.
कन्या अथवा मिथुन लग्न असल्यास बुध ग्रह राहू अथवा केतू शनी सोबत असल्यास त्याचप्रमाणे बुध ग्रह सहा, आठ, बारा भावात असल्यास वापरावा. यासोबतच हस्तरेषा प्रमाणे उजव्या व डाव्या हाताच्या करंगळीवर जाळीदार चिन्हे, फुली, चिन्हे असल्यास तीन ते सहा सहा कॅरेट पर्यंतचा पन्ना सुचवला जातो.
पन्ना रत्न चांदी अथवा सोन्यामध्ये उजव्या हाताच्या करंगळीत अंगठी अथवा गळ्यामध्ये पेंडेंट करून वापरावे. पन्ना रत्ना मध्ये झांबिया, कोलंबिया, रशिया प्रकारातील पन्ना वापरतात. जांबिया प्रकारातील चौकोनी पन्ना हा अतिशय महाग असतो. अंगठीत अथवा पेंडंट मध्ये वापरताना ओपन सेटिंग प्रकारातला करून घ्यावा. ओपन सेटिंग मध्ये चार ऐवजी आठ होल्डर पॉईंट घ्यावे. ज्यामुळे हे रत्न अतिशय खुलून दिसते. छोट्या-मोठ्या धक्क्याने अंगठीतून पडत नाहीय
कोणतेही महाग रत्न खरेदी करताना ते सर्टिफिकेटसह खरेदी करावे. पन्ना रत्ना सारखी दिसणारी सगोटा, ओनेक्स, बेरियल, सिंथेटिक पन्ना ही रत्ने पन्ना सारखीच दिसतात. परंतु ते पन्ना नव्हेत. पन्ना रत्न कधीही माणिक पुष्कराज मोती किंवा पोवळे यासोबत वापरू नये. ही रत्ने एकमेकांच्या विरोधी तत्वाची आहेत.
पन्ना धारण करताना बुधवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर बुध ग्रहाचा बीज मंत्र ओम ब्राम ब्रीम ब्रों स:, बुध ग्रहा यन नमः या मंत्राचा १०८ वेळा उच्चार करावा आणि रत्न धारण करावे. जांबिया प्रकारातील पन्ना रत्न तीन वर्षापर्यंत वापरावे….

इ मेल – Siddhithombare07721@gmail.com