मुंबई – आम आदमी पार्टीने राज्यात १ डिसेंबर रोजी होणा-या पदवीधर मतदार संघासाठी दोन विभागात पुरस्कृत उमेदवारांची नावे घोषित केली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघात डॅा. रोहित बोरकर तर पुणे विभागात डॅा. अमोल पवार यांना पुरस्कृत केले आहे. आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनजंय शिंदे यांनी त्यासाठी पत्र प्रसिध्दीस दिले आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीनंतर आता आम आदमी पार्टीने विधान परिषदेच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे.