मुंबई – राज्यातल्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघांची निवडणूक येत्या एक डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदार संघांची निवडणूक या अंतर्गत होणार आहे.
निवडणूक आयोगानं आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १२ नोव्हेंबरपर्यंत असून तेरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागं घेता येणार आहेत. मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार असल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.