नाशिक – ज्याप्रमाणे ५०० वर्षाचा प्रभू श्रीरामांचा वनवास संपला तसा विद्यार्थ्यांचाही वनवास संपावा, यासाठी विद्यार्थ्यांनी आज गांधीगिरी आंदोलन केले. विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविण्यात आले. त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी मागणी करण्यात आली. राज्यभरातून अशाप्रकारे पत्र पाठविली जाणार आहेत. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतचा ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर लवकरच संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टन्ससिंगचा वापर करून मोठा पायी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सर्व लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी त्यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांकडून निदर्शने करण्यात येतील, असा इशारा विद्यार्थी संघटनेचे अजिंक्य गीते व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.