नाशिक – सिडको येथील रहिवासी आणि दूरदर्शन वाहिनीचे नाशिक ब्युरो चीफ अजय लांडे-पाटील (वय ३८) यांचे बुधवारी (२० ऑगस्ट) कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्रकारिते कार्यरत होते. दिल्लीत माहिती प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या मीडिया मॉनिटरिंग येथेे त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. त्यानंतर नाशिक येथे दूरदर्शनसाठी ब्युरो चीफ या पदावर ते कार्यरत होते. कोविड कालखंडात ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय असे होते. जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. जिल्ह्यातील अनेक प्रेरणादायी बाबी त्यांनी समाजासमोर आणल्या. नवपत्रकारांसाठीही ते मार्गदर्श होते. माध्यम क्षेत्रातील तरुण उमद्या पत्रकाराचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे. त्यांच्या रुपाने नाशिकच्या पत्रकारितेत पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे.