भोपाळ – पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे अतिरीक्त पोलिस महासंचालक पुरुषोत्तम शर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मारहाणीचा हा व्हिडिओ पुरुषोत्तम यांच्या मुलानेच मोबाईलमध्ये शूट केला आणि त्यानेच पोलिस महासंचालकांकडे त्याची तक्रार केली. त्याची तत्काळ दखल घेत आणि शहानिशा करीत शर्मा यांचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेमुळे देशभरातच शर्मा यांची चर्चा होत आहे.
दरम्यान, शर्मा हे आपल्या मैत्रिणीला भेटायला गेले आणि त्यांच्या पत्नीने त्यांना रंगेहाथ पकडले त्यानंतर ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मारहाणीचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.