बिग बॉसच्या शोमध्ये राखीने अनेकदा काहीतरी खळबळजनक प्रकार केल्याने जणू काही लोकांना हा कार्यक्रम बघायला भाग पाडले जाते. याशोमध्ये एका दृश्यात राखी ही अभिनव शुक्ला, रुबीना दिलक आणि निक्की तांबोळी त्यांच्यासोबत बसलेली दिसून आली. यावेळी राखी म्हणाली, ‘ माझा पती म्हणाला जा, जर तुला घटस्फोट घ्यायचा असेल तर घे! आम्हाला तुझी पर्वा नाही, जा… त्यानंतर राखीचे हे शब्द ऐकून सर्व चकित झाले. यानंतर राखीने सांगितले की, आमच्या लग्नाच्या अवघ्या तीन तासानंतर म्हणजेच लग्नाच्या पहिल्याच रात्री रितेशने घटस्फोटाची धमकी दिली होती. राखीने पुढे खुलासा केला की, त्यानंतर ४ वेळा घटस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर ती अद्याप आपल्या पतीसोबत आहे आणि तिने आश्वासन दिले होते की, ती कोणालाही काहीही सांगणार नाही.