नवी दिल्ली : शाहरुख खानच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण काम करणार आहे. यासाठी तिने तब्बल १५ कोटींची मागणी केल्याची चर्चा आहे. अद्याप चित्रपट निर्मात्यांकडून या चित्रपटासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच चित्रपटाचे नावही अद्याप फायनल झालेले नाही. केवळ पठाण नाव असेल असा अंदाज बांधला जातो आहे. तरीही आतापासूनच याची चर्चा सुरु आहे. शाहरुख खान या महिन्याच्या शेवटी चित्रीकरण सुरु करणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय या चित्रपटात सलमान खान देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याची चर्चा आहे.
दीपिका सध्या गोव्यात एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. याआधी शाहरुख आणि दीपिकाने ‘ओम शांती ओम’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ या दोन चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता या चित्रपटासाठी दीपीकाने होकार दिल्यास शाहरुख व दीपिकाचा आणखी एक चित्रपट असेल.