नाशिक – भाजपा आता स्थानिक पातळीवरील प्रत्येक निवडणुकीत सहभाग घेणार असल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने मनापासून पक्ष बांधणीसाठी पुढे येण्याचे आवाहन प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केले.
येथील वसंत स्मृती भाजप कार्यालयात आयोजित युवा मोर्चा कार्यकारणी निवडपात्र वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, जिल्हा सरचिटणीस शरद कासार, ऍड अरुण खांडबहाले, सुनील जाधव, योगिता आवारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नारायण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागात पक्षाचे संघटन वाढवीत विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील रहावे व त्यासोबत केंद्राच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती घराघरात पोहचवावी असे प्रतिपादन भाजपा तालुकाध्यक्ष नितीन गायकर यांनी केले.
यावेळी समीर काळे- संघटन सरचिटणीस, अनिल थोरात व बापू जगताप- सरचिटणीस, रोहित कसबे, लोकेश सूर्यवंशी,राहुल बोराडे -उपाध्यक्ष तर नरेश कुसरे यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली.सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष केदा आहेर, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सुनील बच्छाव आदींनी शुभेच्छा दिल्या आहे.