नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस आज सकाळी घेतला. गेल्या १ मार्च रोजी त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. येथील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी हा डोस घेतला. पुद्दुचेरीच्या नर्सने त्यांना हा डोस दिला. कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण गरजेचे असून आवर्जून लवकरात लवकर ही लस घ्यावी, असे आवाहन मोदी यांनी केले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1379974475278557187