नवी दिल्ली – देशात कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर राजकीय नेत्यानीं ते जनतेचे प्रतिनिधी असतानाही आतापर्यंत लस का घेतली नाही? असा प्रश्न विचारल्या जात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यापासून ते खासदार, आमदार यांच्यापर्यंतच्या नेत्यांना कोरोना लस दुसर्या टप्प्यात मे महिन्यात घेता येईल, असे सांगण्यात येत आहे. सध्या कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू असून तो येत्या एप्रिलमध्ये संपेल. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते की, ही लस आल्यानंतर आपण प्रथम तीचा डोस घेऊ. याचा पहिला टप्पा एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, तोपर्यंत आणखी अन्य लस उपलब्ध होतील.
एवढे मंत्री लसीकरणात भाग घेणार – दुसर्या टप्प्यात देशातील 75 टक्के खासदार, मुख्यमंत्री आणि 5O पेक्षा जास्त वयाचे मंत्री यांना ही लस दिली जाईल. यापैकी, ज्या लोकप्रतिनिधीनां उच्च रक्तदाब किंवा मधुमेह इत्यादी संबंधित रोग अनियंत्रित स्थितीत असतील, त्यांना लस दिली जाणार नाही. सध्या लोकसभेत 343 आणि राज्यसभेतील 200 सदस्य हे 50 किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. तसेच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील 95 टक्के मंत्री लसीकरणात भाग घेऊ शकतात.
मतदार संघात विशेष मोहीम – लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होताच लोकसभा ते विधानसभा मतदारसंघात खास मोहीम राबविण्यात येतील, ज्याची जबाबदारी संबंधित भागाच्या लोक प्रतिनिधीवर असेल. याकरिता खासदार आणि आमदार त्यांच्या मतदारसंघात क्षेत्रात पोहोचून लसीकरणामध्ये सहभागी होऊ शकतात.
वेगवेगळे टप्पे – लसीकरण योजनेशी संबंधित आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वेगवेगळ्या टप्प्यांचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्याही प्रतिनिधीला ही लस दिली जाऊ शकत नाही. याबद्दल यापूर्वी बरीच चर्चा झाली आहे, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन माजी पंतप्रधान- एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशात अनेक लोकप्रतिनिधींचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यांना प्रथम प्राधान्य म्हणून लस दिली जाऊ शकते. यामध्ये दोन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवगौडा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरपा यांचा समावेश आहे.
जलद लसीकरण – लसीकरणासाठी नेमलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्स तज्ज्ञच्या मते, लवकरात लवकर २ कोटी लोकांना लस देण्यासाठी राजकारण्यांचे सहकार्य आवश्यक आहे. दिल्ली एम्सचे एक वरिष्ठ अधिकारी आणि सैन्यातले सदस्य म्हणाले की, लसीकरणाबाबत लोकांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत. हे गैरसमज दूर करण्यात नेते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान याबाबत माहिती देऊ शकतात