देवळाली कॅम्प – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली कॅम्प येथे भाजप व रिपाइंच्या वतीने येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मोकळ्या जागेमध्ये सुमारे ७० विविध फळरोपांची लागवड व फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे, नगरसेवक बाबुराव मोजाड, माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया माजी तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, शहराध्यक्ष जीवन गायकवाड, भाजप नेते बाबुशेठ कृष्णानी, रिपाइं नेते भीमराव धिवरे,अमोदजी शहाणे, शहराध्यक्ष पंडित साळवे, आर. डी. जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष संतोष मेंढे, सतीश कांडेकर ,अक्षय गवळी, विजय कुकरेजा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.