नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्समध्ये कोरोना व्हायरसची पहिली लस घेतली. मोदी यांनी स्वतः सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर याची माहिती जनतेला दिली. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘मी एम्समध्ये कोविड-१९ व्हॅक्सीनचा पहिला डोज घेतला. आपले डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी कोरोना महामारीविरुद्ध दिलेला लढा उल्लेखनीय आहे. मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्की व्हॅक्सीन घ्यावे.’
पंतप्रधान मोदींनी भारत बायोटेक कंपनीचे कोव्हॅक्सीन लावले आहे. कोव्हॅक्सीन नावाचे व्हॅक्सीन भारत बायोटेकने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांनी मिळून तयार केले आहे. पुद्दुचेरीची सिस्टर पी. निविदा यांनी पंतप्रधान मोदींना व्हॅक्सीनचा डोज दिला.
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया देखील यावेळी उपस्थित होते. विरोधकांनी भारतात तयार होणाऱ्या व्हॅस्कीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मोदींनी ही लस घेऊन विरोधकांना उत्तर दिले आहे. कारण काहींनी तर चक्क मोदींनी पहिले लस घ्यावी मगच आम्ही घेऊ, अशीही भूमिका घेतली होती.
https://twitter.com/narendramodi/status/1366200664402006016